कुडाळात भाजपाला धक्का, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

6723

कुडाळ तालुका भाजपाचे अल्प संख्याक सेल तालुकाध्यक्ष तथा झाराप ग्रामपंचायत सदस्य बशीर खान यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश भाजपाला धक्का मानला जात आहे.

यावेळी बशीर खान यांच्या समवेत कादर याकूब खान, इन्तेखाब उमर खान, आसद बशीर खान, इम्रान याकूब खान, मोहसिन इन्तेखाब खान, कादर गोधड, मोहसिन खुदबुद्दीन जद्दी, इक्बाल याकूब खान, अमजद म्हामुद खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या विचारांशी व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन सिंधूदूर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश केल्याचे बशीर खान यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रवेशकर्त्या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करीत सर्वांचा संघटनेत योग्य तो मान-सन्मान राखला जाईल असे सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळा कनयाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, अल्प संख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नझीर शेख, शहर अध्यक्ष संग्राम सावंत, अल्पसंख्याक शहराध्यक्ष हमीद शेख, युवक शहर अध्यक्ष हेमंत कांदे, अशोक कांदे, सुशांत वायंगणकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या