हिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत! -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे

23

सामना प्रतिनिधी। कुडाळ

बा देवा गवळदेवा…म्हाराजा… आज वटपोर्णिमेच्या निमित्तान हिंदुस्थान आणि पाकिस्तानाची मॅच इंग्लंडात सुरू आसा…आणि ही मॅच हिंदुस्थानान जिंकूची ह्येच्यासाठी तुझ्या चरणी ह्या भरलेला नारळाचा फळ ठेवला आसा..हिंदु्स्थानन ही मॅच जिंकूची ह्येच्यासाठी सगळे शक्ती एकत्र कर..आमचे जे काय पोरगे ही मॅच खेळतत त्यांच्या हातापायाक काय दुखापती झाले असतीत तर त्येंका बरे कर..तरी हि मॅच हिंदुस्थानन पाकिस्तानाच्या नाक्कावर टिचान कोणत्याही परिस्थितीत जिंकांदेत..ह्या मॅचीकडे सगळ्या हिंदुस्थानसह महाराष्ट्र आणि कुडाळवाल्यांचे डोळे लागून रवले हत..या सगळ्यांच्या पदरात आनंदाचा यश दे म्हाराजा…तसेच यापढचे सगळे मॅची हिंदुस्थान जिंकूचे आणि वर्ल्डकप पण हिंदुस्थान येवचो…म्हाराजा…होय म्हाराजा…असे मालवणी भाषेतील साकडे कुडाळवासियांनी रविवारी कुडाळ येथील श्री देव गवळदेव चरणी घातले.

कुडाळ एमआयडीसी येथील बॅ.नाथ.पै महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरूण मर्गज यांनी हे मालवणी बोलीभाषेत साकडे घातले. यावेळी बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ संजय निगुडकर, सिद्धेश गाळवणकर, व्यंकटेश भंडारी, परेश धावडे, नितीन बांबर्डेकर, किरण करंदीकर, बळीराम जांभळे, सुरेश वरक आदींसह कुडाळ मधील नागरिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या