पाकिस्तान झुकले, कुलभुषण जाधव यांचा खटला चालणार नागरी कोर्टात

1475

पाकिस्तानात कैद असलेले हिंदुस्थानी नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानने एक पाऊल मागे घेतलेआहे. जाधव यांच खटला नागरी कोर्टात चालणार आहे. जाधव यांना नागरी कोर्टात याचिका दाखल करता यावी म्हणून पाकिस्तान कायद्यातही बदल करणार आहे.

पाकिस्तानी माध्यमात आलेल्या वृत्तानुसार कुलभुषण जाधव हे आता नागरी कोर्टात आपली याचिका दाखल करू शकतात. त्यासाठी पाकिस्तान सरकार आपल्या कायद्यात बदल करण्यास मान्य केले आहे. आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.

पाकिस्तान असे खटले सैन्याच्या न्यायालयातच चालतात. हे न्यायालय लष्कराच्या नियमांवर चालतं. त्यात नागरी न्यायालयात अपील करण्याची तरतूद नाही. कुठल्याही व्यक्ती किंवा संघटनेला नागरी कोर्टात धाव घेण्याचा अधिकार नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलभुषण जाधव यांना ही सूट मिळाली आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकार कायदा बदलण्याच्या तयारीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या