कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले

603

कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने अटक केली आहे. तिथल्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. हिंदुस्थानने जाधव यांच्या पाठीशी उभे राहात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. आता या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे, असे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे (आयसीजे) अध्यक्ष न्या. अब्दुलकावी युसूफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सांगितले. ‘कोणत्याही आरोपीला काऊन्सिलर अॅक्सेस न देण्याबाबत व्हिएन्ना करारात नमूद नाही. तरीही पाकिस्तानने जाधव यांना काऊन्सिलर अॅक्सेस दिला नव्हता. एकप्रकारे त्यांनी जाधव यांना वाईट वागणूक दिली होती व त्यातून त्यांनी व्हिएन्ना कराराच्या कलम 36 चे उल्लंघन केले आहे’, असे आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसचे (आयसीजे) अध्यक्ष न्या. अब्दुलकावी युसूफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या