खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्याने कुल्हड पिझ्झाचा मालक ढसाढसा रडला, व्हिडीओ फॉरवर्ड न करण्याचे केले आवाहन

जालंधरमधील कुल्हड पिझ्झा कपल सध्या चर्चेत आहे. त्यांच्या कुल्हड पिझ्झाचे व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत असतात. परंतु आता त्यांचा एक खासगी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामुळे कुल्हड पिझ्झाचे मालक सहेज अरोरा आणि त्यांच्या पत्नीला प्रचंड ट्रोल केले जात आहे. तर सहज अरोरा यांनी हा व्हायरल व्हिडिओ खोटा असल्याचे सांगत लोकांना हा व्हिडिओ व्हायरल करण्यापासून थांबवण्याचे आवाहन केले आहे. या व्हायरल व्हिडिओसंदर्भात सहज अरोरा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ व्हायरल न करण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते रडताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये सहेज यांनी म्हटले की, ‘हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याबद्दल मला बोलायचे नाही. दोन दिवसांपूर्वीच माझ्या पत्नीचे ऑपरेशन झाले. आमच्या घरी आता आनंदाचे वातावरण असायला हवे होते परंतु या प्रकरणामुळे सगळेच नाराज आहेत.आपला व्हिडिओ अशा प्रकारे व्हायरल व्हावा, अशी कुणाचीही इच्छा नसते.

महिलेने दिली व्हिडिओ लीक करण्याची धमकी!

सहेजने म्हटले आहे की, त्याला एका महिलेने ब्लॅकमेल केले होते. महिलेने त्याला इन्स्टाग्रामवर मेसेज करून पैसे पाठण्याची धमकी दिली, पैसे दिले नाही तर तुमचा खासगी व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी या महिलेने दिली होती. सहेजच्या तक्रारीवरून पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. या घटनेमुळे मला घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याचे सहेजने सांगितले.

एआयच्या मदतीने तयार केला व्हिडिओ!

एका युट्यूबरने काही काळापूर्वी या सहेज आणि त्याच्या बायकोचे व्हिडिओ बनवले होते. याच व्हिडीओंच्या मदतीने हा व्हायरल व्हिडीओ बनवला असल्याचे सहेज याचे म्हणणे आहे. आपला खासगी व्हिडिओ म्हणून जो व्हिडिओ व्हायरल केला जात आहे तो खोटा असून हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे, असे सहेज यांनी स्पष्ट केले आहे.