इंडिगोची प्रवासबंदी कमी झाली तरी मी माफी मागणार नाही!

544

इंडिगो एअरलाईन्सने भले माझ्यावरील प्रवासबंदी कमी करून तीन महिन्यांवर आणली असली तरी मी माझ्या वक्तव्यावर माफी मुळीच मागणार नाही असे स्पष्टीकरण हास्य अभिनेता आणि विनोदवीर कुणाल कामरा याने आज केले. तो इंडिगोच्या त्याच्यावरील बंदी कमी करण्याच्या निर्णयावर बोलत होता. मी इंडिगोच्या विमान प्रवासात रिपब्लिक भारत वाहिनीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याची कारणे विमानाचा वैमानिक आणि सोशल मीडियावरील संदेशातून उघड झाली आहेत असे सांगून विनोदवीर कामरा म्हणाला, मी माफी मागण्यासारखे बोललो असे मला मुळीच वाटत नाही. त्यामुळे इंडिगोने माझ्यावरील प्रवासबंदी घातलेली म्हणून माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इंडिगोने त्यांच्या व्यवस्थापनाच्या आदेशानुसार घेतलेल्या निर्णयाशी माझे देणेघेणे नाही, असेही कामराने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या