मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय अभयारण्यातून आनंदाची बातमी समोर आली आहे. एक मादी चिता गर्भवती असून लवकरच ती बछड्यांना जन्म देणार आहे. याबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी गर्भवती मादी चित्त्याच्या फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली. दरम्यान, मोहन यादव यांनी मादी चित्त्याचे नाव लिहिलेले नाही. मात्र फोटोमध्ये ती चित्ता मादी वीरा असल्याचे दिसत आहे. वीराला मागच्या महिन्यात ग्वाल्हेर येथून या अभयारण्यात आणले होते.
फोटो पाहून तज्ज्ञांनी सांगितले की, पुढच्या दोन ते पाच दिवसात आनंदाची बातमी मिळणार आहे. या पार्कात वीरा, नरिभा आणि धीरा नावाच्या मादी आहेत. वीरा ही नर चित्ता पवनसोबत बराच काळ एकत्र होती.
कूनो में आने वाली हैं खुशियां…
देश के ‘चीता स्टेट’ मध्यप्रदेश के कूनो नेशनल पार्क में जल्द ही मादा चीता नए शावकों को जन्म देने वाली है।
यह खबर ‘चीता प्रोजेक्ट’ की बड़ी उपलब्धि का प्रतीक है। आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में शुरू किया गया ये प्रोजेक्ट… pic.twitter.com/gLz8kD9HJ3
— Chief Minister, MP (@CMMadhyaPradesh) October 19, 2024
17 सप्टेंबर 2022 रोजी कुनोमध्ये सुरु झालेला प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत नामिबियाहून 8 आणि साऊथ आफ्रिकेहून 12 असे 20 चित्ते आणले होते. ज्यामध्ये 8 चित्त्यांचा मृत्यू झाला. तर हिंदुस्थानात आल्यावर 17 बछड्यांचा जन्म झाला आहे, ज्यामध्ये 12 जिवंत आहेत. यामुळे कुनो अभयारण्यात 12 चित्ते आणि 12 बछडे सध्या आहेत.