कुर्ला उड्डाणपुलाला शहीद मेजर कौस्तुभ राणेंचे नाव, शिवसेनेची मागणी मान्य

62

सामना ऑनलाईन । मुंबई

अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचे नाव कुर्ल्यातील उड्डाणपुलाला देण्यास स्थापत्य समितीने मान्यता दिली. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी ही मागणी केली होती. प्रशासकीय मंजुरीनंतरच ही मागणी पूर्ण होणार आहे.

कश्मीरच्या बांदीपूर येथे दहशतवाद्यांना रोखताना मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले होते. वयाच्या 29 व्या वर्षी त्यांना वीरमरण आले. भारतीय सीमारेषेवर कार्यरत असताना दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱया शहीद राणे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदक प्रदान करण्यात आले होते. देशाचे रक्षण करणाऱया या राष्ट्रभक्त वीरपुरुषाची स्मृती चिरंतन राहावी म्हणून कुर्ला येथील कुर्ला-सांताक्रुझ टर्मिनस रोड ते स. गो. बर्वे मार्गाला जोडणाऱया उड्डाणपुलास ‘मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे उड्डाणपूल’ असे नाव द्यावे अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी स्थापत्य समितीच्या बैठकीत केली होती. स्थापत्य समितीने ही मागणी मंजूर केली असून आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पालिका आयुक्तांकडे पाठवली आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर याची अंमलबजावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या