क्वालिटी गंडा, बँकांना 1400 कोटींचा आइस्क्रीम चुना!

दूध व्यवसायातील प्रसिद्ध कंपनी क्वालिटी लिमिटेडने नऊ बँकांना तब्बल 1400 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. सीबीआयने दिल्लीसह आठ ठिकाणी क्वालिटी लिमिटेडच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत.

दुध, ताक, दहीसह क्वालिटी वॉल्स आईस्क्रीम प्रसिद्ध आहे. बँकांची आर्थिक फसवणूक, भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली कंपनीचे संचालक संजय डिंग्रा, सिद्धार्थ गुप्ता, अरुण श्रीवास्तव यांच्यासह काहीजणांवर गुन्हा दाखल केला आहे. बनावट कागदपत्रे, खात्याची खोटी माहिती देऊन बँकांची 1400 कोटी 62 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

या ठिकाणी धाडी
सीबीआयच्या पथकाने देशभरात आठ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली.

या बँकांना चुना
– बँक ऑफ इंडिया
-कॅनरा बँक
– बँका ऑफ बडोदा
-आंध्रा बँक
-कार्पोरेशन बँका
– आयडीबीआय
-सेंट्रल बँक ऑफ इंडिया
– धनलक्ष्मी बँक
-सिंडीकेट बँक

– छापे टाकलेल्या ठिकाणांमध्ये दिल्लीसह हारणपूर, बुलंद शहर (उत्तर प्रदेश), अजमेर (राजस्थान), पालवाल (हरियाणा) येथील क्वालिटी लिमिटेडच्या कार्यालयांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या