नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ‘क्या हुआ तेरा वादा?’ गाणं वाजलं

81

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूरमध्ये धनगर समाजाच्यावतीने आयोजित धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार विकास महात्मे, आमदार तानाजी मुटकुळे, नारायण कुचे तसेच धनगर समाजाचे विविध भागातील नेते यावेळी उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्र्यांचे भाषणामध्ये ‘क्या हुआ तेरा वादा?’ गाणे वाजल्याने त्यांची पंचाईत झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण सुरू करताच धनगर आरक्षणाच्या वायद्याची आठवण करुन देण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी चक्कं काही गाणी वाजवली. या गाण्यांच्या दरम्यान एक-एक ओळीचा तपशील सुद्धा होता. मुख्यमंत्र्यांनी सत्तेत आल्यानंतर वेगवेगळ्या काळात काय-काय शब्द दिला, याची आठवण कार्यकर्त्यांनी त्यांना करुन दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सारवासारव करत आपण आरक्षणाचा शब्द विसरलो नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

विद्यापीठाला अहिल्याबाईंचे नाव

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. महात्मा बस्वेश्वर व सिद्धेश्वर यांचा शासन योग्य सन्मान करेल, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या