गोलपोस्टच्या पलीकडचे – एम्बाप्पे सर्वात पुढे

आता फिफा वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय. अनेक दिग्गज आणि नवोदित जोरदार खेळ करीत अवघ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधत आहेत. त्यात सर्वांना एकच प्रश्न पडलाय, गोल्डन बूट कोणाचा? काल पोर्तुगालच्या गोंजालो रामोसने यंदाच्या स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदविली. आता तो तीन गोलांसह आठ जणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहे, तर फ्रान्सचा किलर किलियन एम्बाप्पे पाच गोलांसह गोल्डन बूटच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. अजूनही 3 सामने बाकी असून कोणता खेळाडू सर्वाधिक गोल करील याचा अंदाज नसला तरी सध्या एम्बाप्पेच प्रबळ दावेदार आहे.