किर्गिस्तानमध्ये घरांवर विमान कोसळले, ३२ ठार

36

सामना ऑनलाईन । बिशकेक

हाँगकाँगच्या दिशेने निघालेले तुर्कस्तानच्या विमान कंपनीचे बोईंग ७४७ हे मालवाहक विमान किर्गिस्तानमध्ये होम्स येथे नागरी वस्तीत घरांवर कोसळले. या दुर्घटनेत ३२ जण ठार झाले आणि अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींची संख्या पाहता मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये वैमानिक तसेच विमानातील आणखी तीनजण आणि निवासी वस्तीतले २८ जण असे ३२ जण आहे.

विमान अपघात सकाळी राजधानी बिशकेकजवळ असलेल्या मानस विमानतळाच्या शेजारीच होम्स येथे झाला. इस्तंबूल येथून हाँगकाँगच्या दिशेने मालवाहक विमान नागरी वस्तीत कोसळले. विमान उतरवत असताना दाट धुक्यामुळे वैमानिकाने धावपट्टीऐवजी चुकीच्या ठिकाणी उतरण्यास सुरुवात केली. चूक लक्षात येताच त्याने विमानाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र आयत्यावेळी दिशा बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे विमान अनियंत्रित झाले आणि अपघात झाला.

आपली प्रतिक्रिया द्या