आमिर खानला झटका; आजच रिलीज झालेला laal-singh-chaddha ऑनलाईन लिक

आमिर खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. आजच प्रदर्शित झालेला लालसिंग चढ्ढा चित्रपट ऑनलाईन लिक झाला आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आमीरचे चाहते हा चित्रपट ब्लॉकबास्टर असल्याचे मानत आहेत. तर अनेक समीक्षकांनी हा सुमार चित्रपट असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनामुळे हा चित्रपटाने लक्ष वेधले होते. हा चित्रपट हिट ठरणार की आपटी खाणार याची चर्चा मनोरंजन वर्तुळात रंगली आहे. आमीरलाही या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र, हा चित्रपट ऑनलाईन लिक झाल्याने त्याची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लालसिंग चढ्ढा Tamilrockers, movierulz आणि पायरसी बेस्ट काही वेबसाईटवर लिक झाला आहे. सोशल मिडीयावरही हा चित्रपट लिक झाल्याची चर्चा आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच चित्रपट लिक झाल्याने त्याच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपला चित्रपट सिनेमाघरात जाऊन बघावा, असे आवाहन आमीर खानने चाहत्यांना केले होते. मात्र, आता हा चित्रपट लिक झाल्याने कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याआधीही काही चित्रपट लिक झाले आहेत.

आमिर खान आणि करीना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चढ्ढा गुरुवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारी मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली होती. या मोहिमेमुळे हा चित्रपट यशस्वी होतो का फ्लॉप याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी एक ट्विट करत या चित्रपटाबाबतची त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाने सपशेल निराशा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तरण यांनी म्हटलंय की आमिर खान याने लालसिंग चढ्ढा या गाडीद्वारे कमबॅक केलं, मात्र या गाडीचं अर्ध्या रस्त्यात इंधन संपून गेलं. चित्रपटाची पटकथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरत असून चित्रपटाचा उत्तरार्थ हा देखील प्रेक्षकांसाठी अनाकर्षक ठरलाय. चित्रपटात काही गोष्टी चांगल्या आहेत, मात्र एकूण मिळून पाहता चित्रपट फारसा चांगला नाही, असे काही समीक्षकांचे मत आहे.