टोमॅटोसाठी पाकड्यांची वणवण, 320 रुपये प्रति किलो

865

हिंदुस्थानबरोबर व्यवहार तोडणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे. माल कमी मागणी जास्त असल्याने पाकिस्तानमध्ये टोमॅटोचे दर प्रति किलो 320  रुपयांवर पोहचले आहेत. यामुळे गृहीणींची डोकेदुखी वाढली असून काहीजणांनी जेवणात टोमॅटो ऐवजी दह्याचा वापर सुरू केला आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर चवताळलेल्या पाकड्यांनी हिंदुस्थानबरोबरचे सर्व व्यवहार थांबवले आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील आय़ात निर्यात पूर्णपणे बंद आहे. इतर देशांच्या तुलनेत शेजारील राष्ट्र असल्याने हिंदुस्थानकडुनच टोमॅटो आयात करणे पाकिस्तानला सर्वच दृष्टीने सोयीस्कर होते. पण आता दोन्ही देशातील आयाच निर्यातच बंद असल्याने याचा फटका पाकिस्तानला पटत आहे. पाकिस्तानला आता दुसऱ्या देशातून टोमॅटो आयात करावे लागत आहेत. ज्याच्यासाठी अधिक खर्च करणे पाकिस्तानला कठीण जात आहे. यामुळे टोमॅटोच्या किंमती य़ेथे 320 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर जेवणाला टोमॅटोची चव यावी म्हणून काही गृहिणींनी टोमॅटोच्या जागी दह्याचा वापर सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या