रेल्वे पोलिसांनी दीड लाखाची रोकड प्रवाशाला परत केली

359

लोकलमध्ये घाईगडबडीत प्रवाशाचे सामान गाडीतच विसरण्याच्या घटना वाढत आहेत. एका प्रवाशाची अशाच प्रकारे विसरलेली दीड लाखाची रोकड रेल्वे पोलिसांनी सहीसलामतपणे शोधून काढीत त्याच्याकडे सुपूर्द केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

मालाडमधील सामाजिक कार्यकर्ते रामासरे शिवनाथ गुप्ता हे चर्चगेट लोकलने प्रवास करत होते. त्यांच्याजवळ दीड लाख रुपये आणि कागदपत्रे असलेली बॅग ते प्रवासादरम्यान लोकलमध्येच विसरले. प्रभादेवी रेल्वे स्थानकादरम्यान ते खाली उतरले असता बॅग गाडीतच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेच  रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने नियंत्रण कक्षाला कळवले. नियंत्रण कक्षाने चर्चगेट रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली.

रेल्वे पोलीस बलाचे जवान अरुण कुमार वर्मा व एमएसएफचे दत्तात्रेय नवघने यांनी चर्चगेटला आलेल्या लोकलचा तपास केला. तेव्हा त्यांना एक बेवारसपणे पडलेली बॅग मिळाली. लोकल प्रवासात विसरलेली दीड लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी रेल्वे पोलीस अरुण कुमार वर्मा व महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवान दत्तात्रेय नवघने यांनी प्रवाशाला परत केली.

बॉम्बच्या भीतीने बॅग सुरक्षित

दीड लाख रुपये परत मिळाल्याने प्रवाशाने रेल्वे पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करीत आभार मानले आहेत. त्यांच्या बॅगेत दीड लाख रुपये व कागदपत्रे, चेक, एटीएम कार्ड होते. कोणत्याही बेवारस वस्तूला हात लावू नका अशा सूचना रेल्वेतून वारंवार दिल्या जात असतात. त्यामुळेच घाबरून कोणी बॅगेला हात न लावल्याने ती सुखरूपणे सापडल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या