जालन्यात औद्योगिक वसाहतीमध्ये भरदिवसा 8 लाखांला लुटले

328

जालना येथील औद्योगिक वसाहत येथील शक्ती इलेक्ट्रॉन मिलच्या गेटवर 4 हल्लेखोरांनी एका उद्योजकाच्या मुनिमावर हल्ला करुन तब्बल 7 लाख 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना आज दुपारी घडली. दरम्यान, मुनीम आलम पठाण यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

उद्योजक विशाल दाड हे आपले मुनीम आलम पठाण यांच्यासह राहत्या घरातून 7 लाख 80 हजार रुपयांची रोकड कारमधून कंपनीत घेऊन निघाले होते. विशाल दाड यांच्या शक्ती इलेक्ट्रॉन मिलच्या गेटवर कार आल्यानंतर विशाल दाड हे मिलमध्ये गेले, त्यानंतर त्यांचे मुनीम आलम पठाण हे कारमधून रोकडची बॅग घेऊन मिलमध्ये जात असताना दबा धरुन बसलेल्या चार दरोडेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि त्यांच्याकडील 7 लाख 80 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. दरम्यान या हल्ल्यात आलम पठाण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या