नरेंद्र कुमारच्या शोसाठी पुरुष मॉडेल लिपस्टिक लावून चालले रॅम्पवर

89

सामना ऑनलाईन । मुंबई

‘लॅक्मे फॅशन वीक’ हा हिंदुस्थानातला सर्वात मोठा फॅशन शो. या शोमध्ये रॅम्पवर चालणे म्हणजे प्रत्येक मॉडेल्ससाठी ती एक मोठी संधीच असते. या शोमध्ये संधी मिळण्यासाठी मॉडेल्स कुठल्याही थराला जायला तयार होतात. आता हेच बघा ना, फॅशन डिझायनर नरेंद्र कुमारचे ‘द मिलेनियल्स’ हे कलेक्शन सादर करण्यासाठी पुरुष मॉडेल हे चक्क आकाशी रंगाचे ग्लिटरी (चमकते) आयशॅडो व भडक लिपस्टिक लावून रॅम्पवर आले. अशा प्रकारचा वेगळा प्रयोग करणारे नरेंद्र कुमार हे पहिले डिझायनर आहेत.

‘द रस्टिक अर्बन जंगल’ थीमवर आधारित या कलेक्शनमध्ये कपड्यांवर पाना फुलांच्या प्रिंट आहेत. तसेच यात जास्ततर हिरवा, निळा, खाकी रंगाचा वापर करण्यात आला आहे. नरेंद्र कुमारच्या या शोचा बॉलिवूड अभिनेता राहुल खन्ना हा शो स्टॉपर होता.

आपली प्रतिक्रिया द्या