Lal Singh Chaddha – निराशाजनक! चित्रपट समीक्षकाने लाल सिंग चढ्ढा पाहिल्यावर नाक मुरडलं

आमिर खान आणि करीना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चढ्ढा गुरुवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारी मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली होती. या मोहिमेमुळे हा चित्रपट यशस्वी होतो का फ्लॉप याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी एक ट्विट करत या चित्रपटाबाबतची त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाने सपशेल निराशा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तरण यांनी म्हटलंय की आमिर खान याने लालसिंग चढ्ढा या गाडीद्वारे कमबॅक केलं, मात्र या गाडीचं अर्ध्या रस्त्यात इंधन संपून गेलं. चित्रपटाची पटकथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरत असून चित्रपटाचा उत्तरार्थ हा देखील प्रेक्षकांसाठी अनाकर्षक ठरलाय. चित्रपटात काही गोष्टी चांगल्या आहेत, मात्र एकूण मिळून पाहता चित्रपट फारसा चांगला नाही

चित्रपटात अभिनयाची हौस भागवल्यानंतर समीक्षणाकडे वळलेल्या कमाल खान याने काही ट्विट करत या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने एक केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटलंय की हैदराबादच्या एका थिएटरमध्ये चित्रपटाचे एकही तिकीट विकले न गेल्याने शो रद्द करावा लागला. कमाल खानने दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटलंय की आमिर खानच्या गेल्या 10 वर्षातील चित्रपटांपैकी सगळ्यात नीचांकी सुरुवात लाल सिंग चढ्ढाला मिळाली आहे.