आमीरच्या ‘लाल सिंह चड्ढा’चे शूटिंग सुरू; तुर्कीमधील फोटो व्हायरल

672

लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या फिल्म इंडस्ट्रीने आता कुठे हातपाय हलवायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार आपल्या आगामी ‘बेल बॉटम’ सिनेमाच्या शूटिंगसाठी ब्रिटनला रवाना झालेला आहे. त्यातच आता आमीर खान त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमासाठी विदेशात असल्याचं समजतं. तुर्की देशातील आमीरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमासाठी आमीरने याआधी कोलकाता, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांत शूटिंग केलं आहे. त्यानंतर आता तो परदेशातील शूटिंग शेडय़ूल पूर्ण करत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमा 1994 सालच्या रॉबर्ट जेमेकीस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूडपटाचा अधिकृत रिमेक आहे. ‘फॉरेस्ट गंप’मध्ये सुपरस्टार टॉम हॅक्स याने मुख्य भूमिका केली असून या सिनेमाला ‘ऑस्कर’सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘लाल सिंह चढ्ढा’मध्ये करिना कपूर हिची महत्त्काची भूमिका आहे. गेल्या वर्षी कोलकाता आणि चंदिगडमध्ये ‘लाल सिंह चड्ढा’ची टीम शूटिंग करताना दिसली होती. त्यानंतर आता आमीरने कोरोनामुळे तुर्कीचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय.

आपली प्रतिक्रिया द्या