पराभवातून काहीतरी शिका आणि एकत्र या, लालूंचा मुलायम आणि मायावतींना पुन्हा सल्ला

सामना ऑनलाईन,पाटणा

उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी समाजवादी पार्टी आणि एकेकाळी सत्तेत असलेल्या बहुजन समाज पक्षाला धोबीपछाड देत भाजपाने विक्रमी बहुमत मिळवलं. या पराभवातून मुलायमसिंह यादव आणि मायावती यांनी एकत्र यावं असा सल्ला राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी दिला आहे.

भाजपाच्या विरोधात देशभरातील धर्मनिरपेक्ष शक्तींनी, पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. हा सल्ला देण्याची लालूप्रसाद यादव यांची ही पहिली वेळ नाहीये. उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी देखील त्यांनी मुलायमसिंह यादव आणि  मायावती यांना हाच सल्ला दिला होता. मात्र या दोघांनीही तो फारसा मनावर घेतला नव्हता. लालू प्रसाद यादव यांच्या विनंतीनंतरही दोघे वेगवेगळे लढले होते. समाजवादी पक्षाने काँग्रेससोबत युती केली या परीणाम हा झाला की ४०३ जागांपैकी एकट्या भाजपाने ३१२ जागा जिंकल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या