नोटाबंदीच्या विरोधात लालूप्रसाद यादव पाळणार ‘श्राद्ध दिवस’

9

सामना ऑनलाईन । पाटणा

नोटाबंदीविरोधात देशभरातील विरोधकांनी एकत्र येऊन ८ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळणार असताना राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी मात्र तो दिवस ‘श्राद्ध दिवस’ म्हणून पाळणार आहेत. लालूप्रसाद यादव यांनी स्वत: याची घोषणा केली आहे. पण इतर विरोधकांसोबत ते काळा दिवस देखील पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

येत्या बुधवारी नोटाबंदीसच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त देशभरातील १८ विरोधी पक्ष ‘काळा दिवस’ पाळणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयामुळे जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. नोटाबंदी करून आम्ही काळ्या पैशांविरोधात कारवाई करता असून जनतेला त्याचा फायदा होईल अशी आश्वासने देण्यात आली होती. ही आश्वासने काही पूर्ण झाली नाहीत त्यामुळे या आश्वासनांचे श्राद्ध घालण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे लालूप्रसाद यादव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या