सुपर… लॅम्बोर्गिनीचं नवीन मॉडेल लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये

336

लॅम्बोर्गिनीने सुपरकार ‘हुरकन एव्हो आरडब्ल्यूडी’ हिंदुस्थानात लाँच केली आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 3.22 कोटी रुपये आहे. कंपनी ही ‘हुरकन एव्हो ऑल व्हील ड्राइव्ह मॉडेल’ आणि ‘हुरकन इव्हो स्पायडर मॉडेल’ या दोन्ही कारबरोबर हा नवा मॉडेल विकणार आहे. या दोन्ही कारची किंमत अनुक्रमे 3.73 कोटी आणि 4.1 कोटी रुपये आहे.

नव्या ‘लॅम्बोर्गिनी हुरकन एव्हो रिअर व्हील ड्राइव्ह’मध्ये 5.2 लीटर व्ही10 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 610 पीएस पॉवर असून 560 एनएम टॉर्क उत्पन्न करते. इंजिन 7- ‘स्पीड ड्यू क्लच गिअरबॉक्स’पेक्षा कमी आहे.

वेग

लॅम्बोर्गिनीचा दावा आहे की, 0 ते 100 किलोमीटर धावण्यासाठी प्रति तास 3.3 सेकंद लागतात. तर या कारचा सर्वाधिक वेग हा 325 किलोमीटर प्रति तास आहे.

car-lamb-2

डिझाइन आणि फिचर

कंपनीतर्फे कारच्या समोर नवा स्प्लिटर आणि एअर इन्टेक देण्यात आला आहे. या कारला स्टॅन्डर्ड हुरकन एव्हो कारपेक्षा हटके लुक देण्यासाठी कारमध्ये रिअर डिफ्यूजर देण्यात आला आहे. कारमध्ये 8.4 इंचाचे टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम, फुल डिजिटल इन्स्ट्रूमेन्ट क्लस्टर आणि कारला 19 इंचाचे अलॉय व्हिल्स आहेत.

car-lamb-3

आपली प्रतिक्रिया द्या