कोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी

1204

कोरोना व्हायरसने जगभरात 37 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कलाकार, नेत्यापासून ते राजघराण्यापर्यंत पसरलेल्या या व्हायरसचा शिरकाव क्रीडा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात झाला आहे. जगभरात अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असून काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रात आतापर्यंत या व्हायरसमुळे तीन जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. यातील पहिला मृत्यू स्पेनमधील एका फुटबॉल प्रशिक्षकाचा होता. त्यानंतर लंडनमध्ये पाकिस्तानच्या स्क्वॅशपटूचा मृत्यू झाला होता. आता क्रिकेटमध्येही एकाचा या व्हायरसने बळी घेतला आहे.

लँकेशायर (Lancashire) संघाचे मॅनेजर आणि चेअरमन डेव्हिड हॉगकिस (David Hodgkiss) यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 71 वर्षाचे होते. लँकेशायर संघाने यासंदर्भात निवेदन दिले असून क्लबच्या एका प्रवक्त्याने प्रेस असोसिएशनला हॉगकिस यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाल्याचे सांगितले.

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचाराला साथ मिळत नव्हती आणि दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली. अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह लँकेशायर संघाचे मोठे नुकसान झाले आहे.

screenshot_2020-03-31-15-31-15-751_com-android-chrome

हॉगकिस गेल्या 3 वर्षांपासून लँकेशायर संघाचे मॅनेजर होते. त्याआधी त्यांनी 22 वर्ष ओल्ड ट्रॅफर्ड सोबत काम केले होते. लँकेशायर संघाचे पहिले कोषाध्यक्ष आणि व्हाइस चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. काऊंटी क्रिकेटच्या विकासासाठी आणि क्रिकेटसाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या