जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद

880

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून बिथरलेल्या पाकिस्तानने सीमा भागात कुरघोड्या सुरू केल्या आहेत. शनिवारी पाकिस्तानने नौशेरा सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. लान्स नाईक संदीप थापा असे त्या जवानाचे नाव आहे. अद्याप नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरू असून हिंदुस्थानी लष्कर देखील चोख प्रत्युत्तर देत आहेत.

जम्मू कश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी म्हणून सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या