दरड कोसळल्याने मुंबई-नाशिक दरम्यानची रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत

98

सामना ऑनलाईन, कसारा

मुंबई आणि नाशिकदरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर दगडधोंडे आणि माती जमा झाली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा प्रकार हिवाळा पुलाजवळ झाला असून यामुळे काही काळ कसारा आणि इगतपुरीमधली वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील गाड्या दुसऱ्या ट्रॅकवरून वळवल्याचे सांगितले आहे. ट्रॅकवर जमलेला माती-दगडांचा ढीग बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

कसारा घाटामध्ये गुरुवारी सकाळी 6 च्या सुमारास दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र शहापूरमधील आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कसारा पोलिसांनी रस्त्यावर आलेले दगड धोंडे बाजूला करत ही वातहूक सुरळित केली.

kasara-new-landslide

मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटामध्ये ही दरड कोसळली होती. साधारणपणे याच सुमारास कसारा घाटात नाशिक लेनवर झाड कोसळले होते. यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूकही थांबली होती.

tree-fallen-in-kasara-ghat

हे झाड बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या मुंबईकडे येणाऱ्या आणि नाशिकला जाणाऱ्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या