उरण बाजारपेठेत फणसांची मोठ्याप्रमाणात आवक

57

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

काही दिवसांवर महिलांचा पतिव्रतेचा वटपौर्णिमा हा सण आला आहे. त्यासाठी उरणच्या बाजारात फणस विक्रीसाठी आले आहेत. फणस खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची गर्दी होत आहे. वटपौर्णिमेच्या पुजेसाठी फणसाचे गरे हे महत्वाचे असल्याने महिलावर्ग अख्खे फणसच खरेदी करताना दिसत आहेत. उरणच्या बाजारपेठेत अनेक ठिकाणी हे फणस विक्रेत रस्त्याच्या बाजूला आपली दुकाने थाटून बसले आहेत.

उरण बाजारपेठेत सध्या फणसाचे गरे १५० ते १६० रूपये किलो दराने विकले जात आहेत. तर अखंड फणस ३० रूपये या भावाने विकले जात आहेत. उरण बाजारपेठेतील पालवी नाका, उरण चारफाटा, गांधी चौक, राजपाल नाका या ठिकाणी हे फणस विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. पुर्वी आम्ही फणसाच्या आकारावर त्याचा दर ठरवून विकत असून मात्र यावर्षी अख्खे फणस ३० रूपये किलो या दराने विकत आहोत. प्रामुख्याने कर्नाटक येथिल हे फणस असून काफा जातीचे हे फणस आहेत असे येथिल विक्रेत्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या