प्रजासत्ताक दिनाच्या समारोहावेळी हवाई हल्ल्याची शक्यता

23
republicday-parade

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदु्स्थानच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमावर हवाई हल्ल्याचं संकट घोगांवत आहे. तशा सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिल्या असून दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांनी कडकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. दिल्ली आणि परिसरातील हालचालींवर ड्रोनने नजर ठेवण्यात येणार आहे.

गुप्तचर यंत्रणांनी अॅलर्ट दिला आहे की, दहशतवादी संघटना अमेरिकेतील ९/११ सारखा हवाई हल्ला हिंदुस्थानमध्ये घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. ते लक्षात घेऊन सर्व सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दिल्ली पोलीस आणि सुरक्षादलांनी ५० हजार जवान तैनात केले आहेत. ठिकठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. नागरिकांना सुरक्षेसंदर्भातील सूचना देण्यात येत आहे. तसेच कोणतीही संशयित व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस कक्षाला देण्यास सांगितले आहे. काही काळासाठी या भागातील विमानांची उड्डाणे रोखण्यात येणार आहेत. तसेच उंच इमारतीवर सुरक्षा व्यवस्था वाढणवण्यात आली आहे. तसेच विमानविरोधी शस्त्रे बसवण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या