आज सीएसटी-ठाणे शेवटची लोकल रद्द

26

सामना ऑनलाईन, मुंबई

भायखळ्याजवळ असलेला पादचारी पूल पाडण्यात येणार आहे आणि तिथे नवा पूल उभारण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने २८ जानेवारीला रात्री ११.४0 ते २९ जानेवारीच्या पहाटे ५.५0 पर्यंत ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २८ तारखेला रात्री १२.३४ मिनिटांनी सुटणारी सीएसटी-ठाणे ही शेवटची लोकल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२९ जानेवारीला मेगाब्लॉक

मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. या मेगाब्लॉकमुळे सीएसटीकडे येणाऱ्या जलद गाड्या धीमा मार्गावरून चालवण्यात येणार आहे. मुलुंड ते परळ दरम्यान या जलद गाड्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यान सकाळी ११.४0 ते संध्याकाळी ४.४0 पर्यंत ब्लॉक असेल.

आपली प्रतिक्रिया द्या