राम मंदिरासाठी देणार सोन्याच्या विटा, मोगलांच्या स्वयंघोषीत वंशजाचा पुनरुच्चार

1887

सामना ऑनलाईन। हैदराबाद

मोगल घराण्याचे स्वयंघोषीत वंशज असलेल्या याकूब हबीबुद्दीन तुसी (50) यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी सोन्याच्या विटा देण्याचा पुर्नरुच्चार केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिेलेल्या मुलाखतीत त्यांनी मी फक्त सोन्याच्या विटाच नाही तर मंदिरासाठी जमीनही देणार असल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही तूसी यांनी सोन्याच्या वीटा देण्याबद्दल सांगितले होते. तुसी यांनी ते मोगल सम्राट बहादुर शाह जफरच्या सहाव्या पिढीचे वंशज असल्याचा दावा केला आहे.

वादग्रस्त जमिनीवर मालकी हक्क दाखवण्यासाठी आवश्यक असलेले दस्तावेज दोघांपैकी एकाही पक्षाने अजून सादर केलेले नाहीत. यामुळे मोगलांचा वंशज असल्याने आपल्याला आपले मत मांडण्याचा अधिकार असून कमीत कमी माझे म्हणणे तरी ऐकून घ्यावे असे तुसी यांनी म्हटले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या