निवृत्त होऊ नकोस, देशाला तुझी गरज आहे; गानकोकीळेने केली धोनीला विनंती

174

सामना ऑनलाईन । मुंबई

 ‘नमस्कार एम. एस. धोनी. तुम्हाला निवृत्ती घ्यायची आहे असं माझ्या कानावर आलं आहे. कृपया तुम्ही असा विचार करू नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. निवृत्तीचा विचारही तुम्ही मनात आणू नका अशी माझी विनंती आहे’, असे आवाहन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटद्वारे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला केले आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या सध्या चर्चा सुरू आहेत. खासकरून उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाकडून झालेल्या पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला तू निवृत्तीचा विचार करू नकोस, असा आपुलकीचा सल्ला दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून लता मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘काल भलेही आम्ही जिंकलो नसलो, तरी हरलेलो नाही’ अशा भावना ट्विट करीत लतादीदींनी हिंदुस्थानी संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी एक गाणेही शेअर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या