नोटाबंदीविरुद्ध रस्त्यावर उतरलेल्यांवर लाठीहल्ला

59

सामना ऑनलाईन, नागपूर

आरबीआयसमोर नोटाबंदीविरोधात आंदोलन करत घेराव घालणाऱया काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे काही काळ आरबीआय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर पोलिसांनी 8-10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. या कार्यकर्त्यांना त्वरित सोडावे या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांनी रिझर्व्ह बँकेसमोरच ठिय्या आंदोलन केले. शेवटी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सोडून दिले. याप्रकरणी लाठीचार्ज करणाऱया पोलीस अधिकाऱयाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात पाच कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या