प्रभूंच्या कार्यालयासमोर निदर्शने करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

21

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अॅप्रेन्टीस केलेल्या विद्यार्थ्यांना रेल्वेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करणाऱ्या १५०० मराठी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच ८०० विद्यार्थ्यांना संसदमार्ग पोलीस ठाण्यात डांबण्यात आल्याचे कळते. पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे काही जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

रेल्वेमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यांना रेल्वे सेवेत सामावून घ्यावे अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यासाठी देशभरात १०,००० विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. दिल्लीत सुरेश प्रभू यांच्या कार्यालयासमोर मराठी मुलामुलींची निदर्शने शांततेत सुरू होती. मात्र त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अशा माहिती मिळते.

आपली प्रतिक्रिया द्या