लातूर – 67388 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले, 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

लातूर जिल्ह्यातील 67388 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. शनिवारी नवीन 1102 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1501 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेले आहेत. 209 अहवाल प्रलंबित आहेत. 355 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या प्रलंबित मधील 288 पॉझिटिव्ह आले आहेत. 2139 रॅपिड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 455 जण पॉझिटिव्ह आढळून आले.

लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80054 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11140 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1526 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 67388 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1148 आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्येने 80 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

सध्याची जिल्ह्यातील वाढत जाणारी संख्या लक्षात घेता या महिन्यात एक लाखाचा टप्पा ओलांडला जाईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या