लातूर शहरातील एकाच कुटुंबातील 09 सदस्यांना कोरोनाची लागण

8284

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 29 मे 2020 रोजी एकुण 226 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 209 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले. पण, लातूर येथील तब्बल 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याने लातूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी होते. त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर दोघांचे अहवाल अनिर्णित आले आहेत. 10 पॉझिटिव्ह पैकी 09 व्यक्ती दिनांक 28 मे 2020 रोजी मोती नगर लातूर येथे पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहेत. तर 1 व्यक्ती देसाई नगर लातूर येथील असून ती व्यक्ती मुंबईवरून प्रवास करून आलेली आहे. व त्या रुग्णास न्युमोनिया असून श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच त्या रुग्णास सध्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे व 02 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असून त्यापैकी सर्वच 16 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. चाकुर येथुन 02 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते, त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निलंगा येथील 04 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय, लातुर येथील 05 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते, त्यापैकी सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

लातूर जिल्ह्यातील एकूण 50 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 38 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 12 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. 29 मे रोजी एकुण आज 226 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 209 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 17 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

लातूर जिल्हा कोरोना अपडेट
जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या -129 (शिराढोण तालुका, कळंब जिल्हा, धाराशिव येथील एका रुग्णाची नोंद धाराशिव जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे, मात्र उपचार लातूर येथे सुरू आहेत)
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -66
उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या- 61
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -03
शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -01

आपली प्रतिक्रिया द्या