औसा बाजार समितीत सोयाबीनला 7221 रुपयांचा विक्रमी दर

लातूरमधील औसा येथील कृषी ऊत्पन्न बाजार समितीत सोयाबिनच्या दराने मागच्या वर्षातील सर्व उच्चांक मोढीत काढत सर्वाधिक 7221 रूपये प्रती क्विंटल एवढा दर मिळवला. ही दराची धूळवड शेतकऱ्यांना आर्थिक आनंद देणारी ठरली आहे. सोयाबीनला सर्वाधिक भाव देणारी औसा कृषी उत्पन्न बाजार समिती अव्वल ठरली आहे.

चालू हंगामात सर्वाधिक आवक येण्याचा नवा विक्रमही झाला आहे. याला केवळ औसा तालुक्यातील शेतकरी नव्हे तर शेजारील धाराशिव जिल्ह्यातील व कर्नाटकातील हजारो शेतकऱ्यांनी औसा बाजार समीतीला पसंती दिली आहे सर्वाधिक भाव देण्यासाठी हंगामाच्या सुरुवातीपासूनच चढाओढ लावली म्हणूनच सोयाबीनच्या दरात ऊच्चांक पाहायला मिळाला. हंगामाच्या सुरवातीपासूनच चढाओढ होती म्हणून सोयाबिन प्रति क्विंटल चार हजार यावर पहिल्या दिवसा पासून दर मिळत गेला आणि आज ते सोयाबीन 7221 वर पोहोचले आहे.

बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले , उपसभापती किशोर जाधव तसेच सचिव मुस्ताक शेख स्वतः त्यातून व्यापारी शेतकरी यांना सहकार्य करीत शेतकऱ्यांना सर्वाधिक दर कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले म्हणूनच मागच्या एका महिन्यात प्रति क्विंटल दोन हजारने सोयाबीन दरात उसळी मिळाली आहे

औसा बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजन काटे,सर्वत्र सीसीटीव्ही बसवले आहेत. MY APMC या नावाने स्वतःचे अँप तयार केले आहे. हे अॅप कोणताही शेतकरी आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेऊ शकतो. या अॅपच्या माध्यमातून बाजार समितीची अद्यावत माहिती रोजचा रोज बाजार भाव सर्वाना माहीत होतं असतो. हे अॅप सर्व शेतकरी बांधवाने डाउनलोड करावे असे आव्हान उपसभापती किशोर जाधव यांनी केले आहे

आपली प्रतिक्रिया द्या