लातूरात व्यापाऱ्यावर दुचाकीस्वारांचा हल्ला, धारदार सुऱ्याने अंगठाच कापला

murder-knife

दुकान बंद करुन घराकडे परत जाणाऱ्या व्यापाऱ्यावर दुचाकीस्वारांनी चाकूचा वार करुन त्याचा अंगठा तोडला. चोरट्यांनी व्यापाऱ्याकडील 1 लाख 80 हजार रुपयांची रोकड आणि 5 हजार रुपयांचा मोबाईल असा ऐवज पळवून नेला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलावर रात्री ही घटना घडली.

या संदर्भात मदन गंगाधरराव बीदरकर रा. वैभव नगर लातूर याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. गांधी मार्केट येथील दुकान बंद करुन रात्री 8.30 वाजता दुचाकीवरुन घराकडे परत जात होते. उड्डाणपुलावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा युवकांनी त्यांना हाक मारली. पाठीमागे वळून पाहिले असता एकाने त्यांच्या दुचाकीला लाथ मारली, त्यांच्या जवळील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. बॅग धरुन ठेवली असता चाकूने त्यांच्या हातावर वार केला. यामध्ये त्यांच्या आताचा अंगठा तुटला. पैश्याची बॅग घेऊन ते दोघे राजीव गांधी चौकाकडे पळून गेले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात दोघांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.