घरफोडी करून सोन्याचे दागिने रोख रक्कम पळवली, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर शहरातील सुभाष नगर भागातील घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 71 हजार 400 रुपयांचा ऐवज पळवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बबन सदाशिव चव्हाण रा. पार्थ अपार्टमेंट सुभाष नगर लातूर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादी राहत असलेल्या मालकीच्या पार्थ अपार्टमेंट मधील फ्लॅट क्र. 301 चे घराच्या दाराचा अज्ञात चोरट्याने कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरुम मधील लोखंडी कपाट उघडून आत ठेवलेले सोन्याचे दागिने 18 ग्रॅमचे सोन्याचे झुमके, गळ्यातील सोन्याची कंठी 10 ग्रॅम वजनाची, एक 5 ग्रॅमची अंगठी, कानातील सोन्याचे रिंग 1 ग्रॅमचे असे एकूण 38 ग्रॅम सोन्याचे दागिने जुने वापरते प्रती तोळा (किंमत 18000 रुपये) प्रमाणे एकूण 68400 रुपये व रोख 3000 रुपये असा एकूण 71400 रुपयांचा ऐवज अज्ञातच चोरट्याने चोरुन नेला. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार मुळे हे करीत आहेत.