‘लई माजलेत’ म्हणत पोलिसाला मारहाण, मुंबई-पुण्यावरून आलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

2809

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये एका पोलीस हवालदाराला मारहाण करण्यात आली आहे. मौजे देवंग्रा इथे हा प्रकार घडला आहे. मुंबई, पुण्याहून लातूर जिल्ह्यात येणाऱ्यांची पोलीस चौकशी करत आहे. ही चौकशी करायला गेलेले असताना हवालदाराला ही मारहाण झाली. या प्रकरणी तिघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हवालदाराने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की ते पुणे, मुंबई वरुन गावात कोणी आलेले आहे का याबाबत विचारपूस करत असताना श्रीकृष्ण गोकुळ पारवे आणि इतर दोघेजण एकत्र आले आणि त्यांनी ‘पोलीस लई माजलेत’ असं म्हणत मारहाण केली.

पोलिसांवर हल्ल्यांच्या 244 घटना 823 व्यक्तींना अटक

राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील 1 लाख 11 हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या 244 घटना घडल्या. त्यात 823व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.22 मार्च ते 19मे या कालावधीत कलम 188 नुसार 1,11,412 गुन्हे नोंद झाले असून 22,492 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 4 कोटी ५6 लाख ५1 हजार 104 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या 100 नंबरवर प्रचंड भडिमार झाला. 9५,291 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईनअसा शिक्का आहे अशा 680 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 4,07,342 व्यक्ती Quarantine आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत 4,12,3५9 पास देण्यात आले आहेत. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1317 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 67,972 वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 1५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 7 पोलिस व 1 अधिकारी असे एकूण आठ 8, पुणे 1,सोलापूर शहर 1, नाशिक ग्रामीण 1 व ए.टी.एस. 1 अशा 12पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात 142 पोलीस अधिकारी व 1246 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. राज्यात एकूण 3717 रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास 3,५4,19५ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. लॉक डाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉक डाऊन मध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लाँक डाऊन संपले असे नाही. उलट या काळात सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या