लातूर शहरातील सदगुरू नगर भागात घरफोडी, 2 लाख 2500 रुपयाचा ऐवज पळवला

लातूर शहरातील सदगुरू नगर भागातील फ्लॅट फोडून 1 लाख 87 हजार 500 रुपयाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 15 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेले.

या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मनोहर रामराय सुवर्णकार (रा. सदगुरू नगर लातूर) यांनी तक्रार दिली. फिर्यादीच्या यांच्या फ्लॅट नं. 201 मधील घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून मुख्य दाराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला.

बेडरुममधील लोखंडी कपाटाचे कुलूप उचकटून आतील सामान अस्ताव्यस्त करून कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे मिनी गंठण, पाटल्या, लॉकेट, कानातील फुले-झुमके असे एकूण 7 तोळे पाच ग्रॅम वजनाचे जुने वापरते (किंमत 1 लाख 87 हजार 500 रुपये) व रोख रक्कम 15 हजार रुपये असा एकूण 2 लाख 2500 रुपयांचा ऐवज पळवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या