लातूरला पाणी आले नाही तर राजीनामा देईन! संभाजी निलंगेकर-पाटील

1919

‘लवकरच उजनीचे पाणी लातूरला आणणार आहे. जर हे पाणी नाही आणले तर ज्या पदावर आहे  त्या पदाचा मी राजीनामा देईन’ अशी भूमिका पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी घेतली आहे. ही भूमिका घेत असतानाच त्यांनी विरोधकांनाही प्रश्न विचारला आहे. जर पाणी आले तर विरोधक राजकारण सोडून घरी बसणार का? हा सवाल त्यांनी विचारला आहे.

लातूर जिल्हा भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचाराचा शुभारंभ निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथे करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री  निलंगेकर-पाटील म्हणाले की  ,विकास हा कधीच पूर्ण होत नसतो,ते एक चक्र आहे आणि ते चालत राहते .मात्र पाच वर्षामध्ये आम्ही विकासाच्या चक्राला गती दिली असं संभाजी निलंगेकर-पाटील म्हणाले.

‘होय मी निलंगेकरांचा नातू आहे, परंतू मी माझ्या  कामामधून माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे ‘ असं निलंगेकर-पाटील म्हणाले. त्यामुळे विरोधकांना सरकारवर बोलण्याचा काहीही अधिकार नाहीअसं म्हणतानाच ते म्हणाले की गेल्या साठ वर्षातील राजकारण गेल्या पाच वर्षात बदलले आहे. एक शेतकरी  जिल्हा परीषद अध्यक्ष म्हणून नियुक्त केला केला’, हा बदल विरोधकांना दिसत नाही का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. .

आपली प्रतिक्रिया द्या