लातूर जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी, सलग तिसऱ्या दिवशी एकही रुग्ण आढळला नाही

1329

लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या काही दिवसांपासून वाढतच होती. परंतु मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 136 वर पोहोचलेली होती. त्यामध्ये लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये 40 रुग्ण होते. त्यापैकी 8 रुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून अद्यापही 32 जणांवर उपचार सुरु आहेत. उदगीर येथील सामान्य रुग्णालयात 73 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 50 रुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले. 3 रुग्णांचा मृत्यूही झाला असून सध्या केवळ 6 रुग्ण उपचार घेत आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौध्द निवासी शाळा कोविड सेंटर तोंडारपाटी (ता. उदगीर) येथे 14 रुग्ण होते. त्यापैकी 6 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून 8 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. निलंगा तालूक्यातील दापका येथे 16 रुग्ण होते त्यापैकी 10 जण उपचारानंतर बरे झाले तर 6 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. मरशिवणी (ता. उदगीर) येथे 5 रुग्ण होते त्यापैकी 2 जण बरे झाले असून 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रेणापूर तालुक्यातील बावची येथे 1 रुग्ण होता तो उपचारानंतर बरा झालेला आहे. तर लातूरातील 12 नंबर पाटी येथे 2 रुग्ण होते त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

PM Care Fundमध्ये किती निधी जमा झाला ? नागपूर खंडपीठाचा सवाल; केंद्र सरकारला धाडली नोटीस

आजपर्यंत 77 रुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आलेले आहेत तर 57 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 3 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. 13 जून पर्यंत हे सर्व रुग्ण उपचारानंतर बरे होतील असे आरोग्य विभागाच्यावतीने जाहिर करण्यात आलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या