झाडे तोडली म्हणून महानगरपालिकेने ठोठावला एक लाखाचा दंड

लातूर शहरात दोन झाडे तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर महानगर पालिका आयुक्तांनी संबंधितांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी पुष्पा ओमप्रकाश सोमाणी मालमत्ता क्र. बी 2-186, आर 8 – 1927 शिवाजीनगर लातूर यांना दिलेल्या आदेशात नमुद केले आहे की, 9 जुन रोजी रात्री महानगरपालिकेची परवानगी न घेता त्यांनी बदामाची 30 फूट उंचीची दोन झाडं तोडली.

महाराष्ट्र नागरी क्षेत्र व झाडाचे जतन अधिनियम 1975 कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी वृक्षाचे 50 हजार रुपये प्रमाणे दोन झाडांचे 1 लाख रुपयाच्या दंडात्मक कारवाई केली आहे. सदरील दंडाची रक्कम नाही भरल्यास मालमत्ता करातून त्याची वसुली करण्यात येईल, असे आदेशात नमुद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या