गातेगाव येथे ट्रॅक्टरसह नांगर पळवला, तर रेणापूर येथे ट्रॅक्टरची ट्रॉली पळवली

लातूर तालुक्यातील गातेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टर आणि नांगर, असा 2 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. रेणापूर येथे अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली (किंमत 70 हजार रुपये) पळवली. या दोन्ही चोरीप्रकरणी गातेगाव आणि रेणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश माणिकराव सोनवणे रा. गातेगाव यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या नावे असलेला न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एमएच 26 बी 9769 आणि नांगर (एकूण किंमत 2 लाख 5 हजार रुपये) पळवला. रेणापूर पोलीस ठाण्यात रामेश्वर बब्रुवान इस्ताळकर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या शेतातील आखाड्यावर लावलेला ट्रॅक्टर क्रमांक एमएच 24 एजी 2154 ची ट्रॉली (किंमत 70,000 रुपये) अज्ञात चोरट्याने चोरून नेली.