लातूर शहरात जबरी चोरी, बंद घर फोडून 10 लाख 50 हजारांचा ऐवज पळवला

2341

लातूर शहरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून 10 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील प्राध्यापक प्रसाद गोविंद जामखंडे हे घर बंद करून गावी गेलेले असताना ही जबरी चोरी झाली आहे. सराईत गुन्हेगारांनी ही घरफोडी केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लातूर शहरातील गुणगुणे नगर भागातील श्री व्यंकटेश अपार्टमेंट, फ्लॅट नं. 201 मध्ये राहणारे प्रसाद गोविंद जामखंडे हे लॉकडाऊनमुळे घर बंद करून उदगीर येथे कुटुंबासह गेले होते. याचाच फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून आतील सोन्याचे दागिने, रोख 3 लाख रुपये असा सुमारे 10 लाख 57 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या