लातूर जिल्ह्यात 02 पॉझिटीव्ह, एकूण रुग्ण संख्या 147 वर पोहोचली

4254
corona virus

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 6 जून 2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 31 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 02 रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे तर 01 अनिर्णित आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 15 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी सर्वच 15 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता. त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती उदगीर शहरातील आझादनगर या भागातील असून मुंबई येथून आलेली आहे. देवणी येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता. त्या व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

स्त्री रुग्णालय, लातुर येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 15 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह तसेच अन्य एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आला आहे. पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे. असे लातुर जिल्ह्यातील एकूण 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 31 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व एका रुग्णाचा अहवाल Inconclusive आला आहे, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या