लातूर जिल्ह्यात 58 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, रुग्ण संख्या 781 वर पोहचली

10630

लातूर जिल्ह्यात जुलै महिना कोरोना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जात आहे. या महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्या वाढलेली आहे. 13 जुलै रोजी 58 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून लातूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या 781 वर पोहचली आहे. 13 जुलै रोजी 341 जणांचे स्वॅब तपासणीसाठी येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले होते.

त्याचप्रमाणे 12 जुलै रोजी 9 प्रलंबित तपासणी अहवाल होते. यामध्ये एकाचा अहवाल रद्द करण्यात आला असून तब्बल 58 कोरोना संक्रमित रुग्ण निदर्शनास आले आहेत. 39 जणांचे स्वॅब अनिर्णित आले असून 244 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. महानगरपालिकेकडून आलेले 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उदगीर येथील 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अहमदपूर येथील 1, देवणी तालुक्यातील 3, औसा तालुक्यातील 8, लातूर एमआयडीसी 3, तर निलंगा तालुक्यातील 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून निलंगा तालुक्यातीलच 7 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 58 असून 39 रुग्णांचे अहवाल अनिर्णित आले आहेत.

लातूर जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 781 झाली असून 388 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे घरी पाठवण्यात आले आहे तर आज रोजी 356 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 37 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गांधी नगर लातूर, कापड गल्ली औसा, झिंगण्णाप्पा गल्ली लातूर, महसुल कॉलनी लातूर, दिपज्योती नगर लातूर, रामगल्ली उदगीर, मदने नगर लातूर, शिरोळ ता. उदगीर, केशवनगर लातूर, विक्रम नगर लातूर, सुळ गल्ली लातूर, कव्हा रोड लातूर, विशाल नगर लातूर, भातांगळी ता. लातूर, नांदेड रोड लातूर, फत्तेपूर ता. औसा, लातूर रोड ता. चाकूर, घाडगे नगर लातूर, मोती नगर लातूर, कैलास नगर लातूर, विक्रम नगर – 2 लातूर, आनंद नगर लातूर, महादेव नगर लातूर, जळकोट रोड उदगीर – 2, गुडसूर रोड उदगीर, तळवेर उदगीर, देगलूर रोड उदगीर, एसटी कॉलनी उदगीर, अहमदपूर, वलांडी 2, देवणी खुर्द, सिग्नल कॅम्प लातूर, बोधे नगर लातूर, शिरुर ताजबंद ता. अहमदपूर, गिरवलकर नगर लातूर, विशाल नगर लातूर, गौसपूरा लातूर, ढोरगल्ली – 2 लातूर, औसा 2, करीम नगर 3 औसा, सीआरपीएफ वॅâम्प 1, सुभाष चौक – 2 लातूर, औराद शहाजानी – 3 ता. निलंगा, शिवाजीनगर 2 निलंगा, पांचाळ कॉलनी निलंगा, मोरतळवाडी ता. उदगीर व निलंगा. येथील रुग्णांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या