लातूर जिल्हा बँकेने  साडे तीन लाख शेतकर्‍यांचा 32 कोटी रुपयांचा भरला विमा हप्ता

1069

पंतप्रधान पीक विमा योजेने अंतर्गत 31 जुलैपर्यंत  लातूर जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील 112 शाखेत  साडे तीन लाख शेतकर्‍यांचा पीक विमा भरला. तब्बल 32 कोटी 4 लाख 55 हजार रुपयांचा पीक विमा हप्ता गावातील स्थानिक सोसायटी मार्फत 31जुलाई पर्यंत बँकेत जमा करण्यात आला आहे. देशातील कोविड 19 ची गंभीर परिस्तीती पाहता शेतकर्‍यांना बँकेत येण्यासाठी  त्रास होवू नये यासाठी राज्याचे माजी मंत्री दिलीप देशमुख यांच्या सुचनेनुसार लातूर  जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेने थेट शेतकर्‍याच्या गावात जाऊन पीक विमा स्विकारला असून यामुळे  जिल्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 112 शाखेत सन्माननीय संचालक मंडळ यांच्या निर्देशानुसार  पीक विमा हप्ता भरून घेण्यासाठी बँक प्रशासन मोठ्या प्रमाणात जादा अधिकारी व बँक कर्मचारी सर्व शाखेवर नियुक्ति करण्यात आले. तसेच शेतकर्‍याचा पीक विमा हप्ता विना तक्रार मदतीत भरून घेण्यासाठी गेली 15 दिवसापासून  बँक प्रयत्न  केला आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात सोसायटीचे चेअरमन व गटसचिव हे गावातील शेतकर्‍याचा पीक विमा सोशल डिस्टन्स पाळत भरून घेतलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या