प्रधानमंत्री खरीप पिकविमा शेतकऱ्याच्या गावातच भरून घेणार, लातूर जिल्हा बँकेचा निर्णय

691

सध्या कोरोना विषाणूचे सावट असल्याने शेतकऱ्यांना बँकेत येऊन पिकविमा भरण्यासाठी होणारा त्रास वाचावा आणि शेतकरी व बँक कर्मचारी यांना रोगाची लागण होवू नये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यावर्षी खरीप पिकविमा आपल्या गावातच सोसायटीचे चेअरमन व गटसचिव यांच्याकडे अर्जाची छाननी करुन द्यावेत असा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड. श्रीपतराव काकडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बँकेच्या मुख्यालयात माजी मंत्री सहकारी महर्षि तथा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत व चेअरमन अँड श्रीपतराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. पिकविमा भरण्यासाठी 31 जुलाई ही शेवटची तारीख असून बँकेने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने शेतकरी सभासदांना पुन्हा एकदा घरपोच सेवा देण्याचा मोठा निर्णय घेतल्याने शेतकरी सभासदांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

बँकेत गर्दी टाळावी 
यासाठी बँकेत गर्दी टाळावी, स्थानिक सोसायटी यांच्याकडे पिक विमा फ़ार्म भरून द्यावा, असे आवाहन बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षीं दिलीपराव देशमुख, चेअरमन अँड. श्रीपतराव काकडे, व्हाइस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या