लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 600 वर

2022

लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंखेच्या वाढीने लातूरकरांची चिंता वाढवलेली आहे. लातूरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 600वर पोहोचली आहे. दिनांक नऊ जुलै रोजी 392 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. 271 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मागील प्रलंबित सहा हवाला पैकी तिघांचे अहवाल हे प्रलंबित आल्याने नऊ जुलै रोजी तब्बल 56 नवीन रुग्णांची वाढ लातूर जिल्ह्यात झालेली आहे.

लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेमध्ये जिल्ह्यातील 392 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 271 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 53 जणांचे अहवाल पॉझिटिव आले. त्रेचाळीस जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित असून तीन जणांचे अहवाल रद्द करण्यात आले होते. 22 जणांचे अहवाल अनिर्णीत आले आहेत. दिनांक 8 जुलै रोजी 06 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 03 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मध्ये उदगीर 11, अहमदपूर 5, निलंगा 6, महानगरपालिका 23, औसा 2, एमआयडीसी लातूर 3, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत आलेले 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. लातूर शहरातील बसवेश्वर चौक 5, भाग्यनगर 4, रामगिर नगर 3, आनंदनगर 2 तर गवळीनगर, सदाशिवनगर, मोती नगर, श्याम नगर, नावंदर गल्ली, सेंट्रल हनुमान, केशवनगर शारदा नगर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 272, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 322 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 28 इतकी आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 612 इतकी आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
लातूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालले आहे. 9 रोजी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एका 59 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. मागील काही दिवसापासून लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. आज लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये उदगीर येथील एस टी कॉलनी भागातील 59 वर्षे वयाच्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आठ जुलै रोजी या रुग्णास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र 9 जुलै रोजी त्याचा मृत्यू झाल्याने लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या