लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा बारावीचा निकाल 90.37टक्के, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.16 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेबुवारी-मार्च 2023च्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर करण्यात आला. लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा निकाल 90.37 टक्के लागला आहे. विभागातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.16 टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 87.32 टक्के आहे. लातूर विभागातील विज्ञान शाखेचा निकाल 96.42, वाणिज्य शाखेचा निकाल 91.24 टक्के, कला शाखेचा निकाल 81.91 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 86.63 टक्के व आयटीआय विभागाचा निकाल 90.69 टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागाचा इयत्ता बारावीसाठी 89 हजार 782 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. 88 हजार 51 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील 79 हजार 572 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा निकाल 90.37 टक्के लागला आहे. लातूर विभागात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची 6 हजार 275, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 26 हजार 966, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 37 हजार 451 तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 8 हजार 880 एवढी आहे.

लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा निकाल 90.37 टक्के लागला आहे. विभागातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.16 टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 87.32 टक्के आहे. लातूर विभागातील विज्ञान शाखेचा निकाल 96.42, वाणिज्य शाखेचा निकाल 91.24 टक्के, कला शाखेचा निकाल 81.91 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 86.63 टक्के व आयटीआय विभागाचा निकाल 90.69 टक्के लागला आहे. लातूर विभागात विज्ञान शाखेत 44 हजार 633 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. त्यातील 44 हजार 239 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 42 हजार 657 एवढी आहे. विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल 96.42 टक्के लागला आहे.

लातूर विभागातील वाणिज्य शाखेसाठी 9 हजार 131 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. त्यातील 9 हजार 34 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 8 हजार 243 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा 91.24 टक्के लागला आहे. लातूर विभागातील कला शाखेत 32 हजार 84 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. त्यातील 31 हजार 21 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 25 हजार 410 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागाचा कला शाखेचा निकाल 81.91 टक्के एवढा लागला आहे.

लातूर विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 3 हजार 762 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. त्यातील 3 हजार 585 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 3 हजार 106 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 86.63 टक्के लागला आहे. लातूर विभागातील आयटीआय शाखेचा निकाल 90.69 टक्के लागला आहे. 172 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 172 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील 156 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

लातूर विभागात मुलींनी बाजी मारली
लातूर विभागामध्ये 44 हजार 833 मुलांनी, तर 39 हजार 218 मुलींनी असे एकूण 88 हजार 51 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 42 हजार 641 मुले आणि 36 हजार 931 मुली असे एकूण 79 हजार 572 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 87.32 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.16 टक्के आहे.

विभागात सर्वाधिक निकाल लातूर जिल्ह्याचा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागात नांदेड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील 38 हजार 928 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 38 हजार 276 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 33 हजार 901 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नांदेड जिल्ह्याचा निकाल 88.56 टक्के लागला. धाराशिव जिल्ह्यातील 15 हजार 945 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. यातील 15 हजार 630 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 14 हजार 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धाराशिव जिल्ह्याचा निकाल 89.75 टक्के लागला. लातूर जिल्ह्यातील 34 हजार 909 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. यातील 34 हजार 145 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 31 हजार 642 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर जिल्ह्याचा निकाल विभागात सर्वाधिक 92.66 टक्के लागला आहे.

नांदेड जिल्ह्यातील 2 हजार 689 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळवले. धाराशिव जिल्ह्यातील 743 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळवले तर लातूर जिल्ह्यातील 2 हजार 843 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळवले. नांदेड जिल्ह्यातील 10 हजार 460 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, धाराशिव जिल्ह्यातील 4 हजार 346 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर लातूर जिल्ह्यातील 12 हजार 160 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. नांदेड जिल्ह्यातील 15 हजार 705 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, धाराशिव जिल्ह्यातील 7 हजार 592 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर लातूर जिल्ह्यातील 14 हजार 158 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. नांदेड जिल्ह्यातील 5 हजार 51 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत, धाराशिव जिल्ह्यातील 1 हजार 348 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत तर लातूर जिल्ह्यातील 2 हजार 481 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

विभागातील नांदेड जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 94.77 टक्के लागला आहे. धाराशिव जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 94.27 टक्के तर लातूर जिल्ह्यातील विज्ञान शाखेचा निकाल 95.90 टक्के लागला आहे. विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल 95.13 टक्के लागला आहे. विभागातील कला शाखेचा निकाल 81.03 टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्याचा कला शाखेचा निकाल 70.23टक्के, धाराशिव जिल्ह्याचा कला शाखेचा निकाल 80.59 टक्के तर लातूर जिल्ह्याचा कला शाखेचा 85.45 टक्के एवढा लागला आहे.

लातूर विभागाचा वाणिज्य शाखेचा निकाल 90.97 टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्याचा वाणिज्य शाखेचा निकाल 88.26 टक्के, धाराशिव जिल्ह्याचा वाणिज्य शाखेचा निकाल 89.73 टक्के तर लातूर जिल्ह्याचा वाणिज्य शाखेचा निकाल 93.32 टक्के लागला आहे. विभागाचा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 85.11 टक्के लागला असून नांदेड जिल्ह्याचा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 79.68 टक्के, धाराशिव जिल्ह्याचा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 85.66 टक्के तर लातूर जिल्ह्याचा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 86.62 टक्के लागला आहे.

लातूर विभागाचा आयटीआय शाखेचा निकाल 88.63 टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्याचा निकाल 87.09 टक्के, धाराशिव जिल्ह्याचा 88.13 टक्के तर लातूर जिल्ह्याचा निकाल 95.83 टक्के निकाल लागला आहे.

लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्याचा निकाल 91.48 टक्के, अहमदपूर तालुक्याचा निकाल 94.73 टक्के, औसा तालुक्याचा निकाल 95 टक्के, चाकूर तालुक्याचा निकाल 94.01 टक्के, देवणी तालुक्याचा निकाल 92.03 टक्के, जळकोट तालुक्याचा निकाल 88.74 टक्के, निलंगा तालुक्याचा निकाल 95.02 टक्के, रेणापूर तालुक्याचा निकाल 91.99 टक्के, शिरूर अनंतपाळ तालुक्याचा निकाल 92.12 टक्के, उदगीर तालुक्याचा निकाल 92.37 टक्के लागला आहे. लातूर विभागातील इंग्रजी विषयाचा निकाल 92.14 टक्के, मराठी भाषेचा निकाल 94.48 टक्के, हिंदी भाषेचा निकाल 95.66 टक्के, संस्कृत भाषेचा निकाल 99.77 टक्के लागला आहे.